Devendra Fadnavis : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; ठाकरे गटावर गंभीर केले आरोप

Devendra Fadnavis : राज्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. या प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या दोन मंत्री दादा भुसे आणि शंभुराजे देसाई यांचा हात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारपरिषद घेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. ललित पाटील याला ड्रग्ज १० डिसेंबर २०२० रोजी अटक झाली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्याला शिवसेनेचं शहरप्रमुख केलं होते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Manoj Jarange Patil News : २४ तारखेच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या, चालढकल कराल, तर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

ललित पाटील याला अटक झाल्यानंतर पोलिसांनी पीसीआर मागितला होता. हा गुन्हा गंभीर असल्यामुळे १४ दिवसांचा पीसीआर मिळाला. त्यानंतर तो ससून मध्ये भरती झाला, असंही फडणवीस यांनी सांगितलं. ससूनमध्ये १४ दिवस भरती झाल्यानंतर सरकार पक्षातर्फे कोर्टाला अर्ज देखील केला नाही.

१४ व्या दिवशी ललित पाटील याचा एनसीआर काढला. ज्यावेळी गुन्हेगार आतमध्ये जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारांची चौकशी देखील केली नाही. माझा प्रश्न आहे की ललित पाटील यांची चौकशी का करण्यात आली नाही, असा सवावही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

दरम्यान, ललित पाटील याची चौकशी न होण्याच्या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार होते की गृहमंत्री जबाबदार होते? अजून खूप गोष्टी आहेत सध्या मी बोलणार नाही, असं म्हणत फडणवीस यांनी लवकरच या प्रकरणाचा उलगडा करणार असल्याचं सांगितलं. ललित पाटील नाशिक शिवसेनेचा शहरप्रमुख होता म्हणून त्याला वाचवलं का? आता नार्को टेस्ट कुणाची करावी, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply