Devendra Fadnavis : अमित शाह शिवरायांचे सेवक, मराठा इतिहासाचे संशोधक - देवेंद्र फडणवीस


Devendra Fadnavis on Shivaji Maharaj : फडणवीस यांनी अमित शाह यांना "शिवरायांचे सेवक" आणि "मराठा इतिहासाचे संशोधक" म्हणून संबोधले. तसेच, शाह यांना देशाचे "कणखर आणि कर्मठ गृहमंत्री" असे वर्णन करून त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही इथे कुणीच दिसले नसते." मुघल, कुतुबशाही, आदिलशाही यांसारख्या सल्तनतींच्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, ज्यामुळे आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रायगडावर छत्रपती शिवरायांचा ३५४ वा पुण्यतिथी अभिवादन सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, छत्रपती उदयनराजे भोसले यांसारख्या दिग्गजांच्या उपस्थितीने या प्रसंगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शिंदेशाही पगडी आणि कवड्यांच्या माळेने अमित शाह यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

Karad Gang : 'या' ४ धारदार हत्याराने संतोष देशमुखांचा जीव घेतला, 'कराड गँगकडून' खास हत्यारं तयार, १५० वार करून देशमुखांना काळं निळं केलं अन्..

शिवरायांचे सेवक म्हणून केंद्रीय मंत्री अमित शाह रायगडावर आले आहेत. अमित शाह हे भारताचे कणखर, कर्मठ गृहमंत्री आहेत. मराठा इतिहासाचे संशोधक म्हणून अमित शाह रायगडावर आले आहेत . छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुम्ही आम्ही इथे कुणीच दिसले नसते. महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून दिले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवरायांमुळे आज आपण स्वतंत्र आहोत. देशात मुघल, कुतुबशाही, आदिलशाही होती.. त्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मराठ्यांच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक झालेच पाहिजे. स्मारकाचा मुद्दा हायकोर्टात लढून मंजूर करून घेऊ असा शब्द यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply