Devendra Fadnavis : …अन पाकिस्तानला माहीत आहे, त्यांचा बाप दिल्लीत बसलाय – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. तेव्हा महाराष्ट्रासह देशात बॉम्बस्फोट व्हायचे. गेल्या दहा वर्षांत कोणी बॉम्बस्फोट करण्याची हिम्मत केली नाही. पाकिस्तानला माहीत आहे त्यांचा बाप दिल्लीत बसला आहे. त्यामुळे भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानची झाली नाही, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचा समाचार घेतला. यावेळी अमोल कोल्हे यांच्यावरही निशाणा साधला.

फडणवीस हे पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते. महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यासाठी भोसरीच्या गावजत्रा मैदानावर प्रचार सभा घेण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे यांसह इतर नेते उपस्थित होते.

Raj Thackeray : मशिदीतून फतवे निघत असतील तर आज मी फतवा काढतो, महायुतीला मतदान करा : राज ठाकरे

अमोल कोल्हे हे चांगले कलाकार आहेत. परंतु, कोल्हे यांचा सिनेमा फ्लॉप झाला आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्या चित्रपटाची किंवा नाटकांची तिकीट नागरिक घेणार नाहीत. दरवेळीप्रमाणे यावेळी देखील त्यांनी मालिकांमधून निवृत्तीची घोषणा केली. हे केवळ नाटक आहे. अशा नाटक करणाऱ्याला जनता त्यांची योग्य जागा दाखवतील अशी खात्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

पुढे ते म्हणाले, जगातील शंभर देश म्हणतात कोविड काळात आम्ही नरेंद्र मोदी यांच्यामुळ जिवंत आहोत. म्हणजे आपले मोदी भारतात नव्हे तर शंभर देशांचे नेते आहेत. पुढे ते म्हणाले, इंडिया आघाडीला पाच वर्षांत पंतप्रधान निवडता आला नाही. ही काय घराणेशाही नाही? फॅक्टरी नाही. इंडिया आघाडीकडे नियत आणि नीती नाही. प्रत्येक नेता स्वतःच्या घरातील व्यक्तीला मोठं करण्यात व्यस्त आहे, असेही फडणवीस म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply