Devendra Fadnavis : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, देवेंद्र फडणवीस यांची माहिती; नाशिक-ठाण्याची जागा मिळणार शिंदेंना?

Devendra Fadnavis : दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं, तरी महायुतीमधील काही जागांचा अजून तिढा सुटलेला नाही. यासंदर्भातदेवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.'महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला', असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांनी लवकरच या सर्व जागांच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

पुढील २४ तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा महायुतीकडून केली जाणार आहे. ठाणे, नाशिक दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत  आहे. तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरूच आहे. ठाण्यातून प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के यांचे नाव आघाडीवर आहे.

Sharad Pawar : PM मोदींची देश चालवण्याची पद्धत पाहून चिंता वाटते, शरद पवारांचे परखड मत

तर दक्षिण मुंबईतून मंगलप्रभात लोढा आणि यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत महायुतीत सस्पेन्स कायम आहे, परंतु लवकरच या जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर होणार आहेत. आता नाशिक आणि ठाण्याची जागा शिंदेसेनेला मिळणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

ठाण्यातील जागेसाठी शिंदे गट आग्रही असल्याचं दिसत आहे. तर आतापर्यंत शिंदे गटाला १३ जागा देण्यात आल्या  आहेत.  नाशिक, पालघर, ठाणे, दक्षिण मुंबई या जागांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

महायुतीमध्ये जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस  यांनी जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचं सांगितलं आहे.  महायुतीच्या उमेदवारांची फायनल यादी पुढील २४ तासांच्या आत जाहीर होणार आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply