Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? स्वत: च दिलं उत्तर, म्हणाले...

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का? अशा बातम्या माध्यमात आल्या होत्या. हे वृत्त लक्षात घेत फडणवीसांनी पुणे शहरावरील प्रेम व्यक्त करताना लोकसभेच्या निवडणुकीची परत एकदा घडवली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मीडिया टॉवर या खासगी तत्वावरील गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे लोकसभा निवडणूक पुण्यातून लढवणार का याविषयी विधान केलं. 

माझं पुण्यावर प्रेम आहे, असं म्हटलं की लगेच मी पुण्यातून लोकसभा लढवणार अशा बातम्या येतात, मात्र मी पुन्हा एकदा सांगतो मी पुण्यातून लोकसभा लढवणार नाही, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मीडिया टॉवर खासगी तत्वावरील गृहनिर्माण योजनेचा शुभारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानाची मोठी चर्चा होत आहे.

Ahmednagar News : प्रवाशांनी भरलेली बस उलटली; शाळकरी विद्यार्थी , जखमी लेकरांसाठी पालकांचा जीव कासावीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिल्या मीडिया टॉवरच्या भूमिपूजन सोहळा पार पडला. आता मीडिया संख्या आणि पत्रकार संख्या वाढतेय मोठं कुटूंब माध्यमाच वाढलं आहे. आधी प्रिन्ट होतं नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आली, त्यानंतर डिजिटल मीडिया आल्याने हे कुटुंब वाढले आहे. यात सामान्य कुटुंबातील तरुण तरुणी काम करत आहेत. माध्यमे लोकशाहीमधील चौथे स्तंभ आहे. या लोकशाहीमध्ये मीडिया फ्री आणि असली पाहिजे. त्यांचे धैर्य वाढलं पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

पुण्यात मीडिया टॉवर केल्यानंतर महाराष्ट्रातील इतर शहरातही,असे मीडिया टॉवर झालेले आपल्याला दिसतील. पत्रकारांच्या घरासाठी काही जिल्ह्यात काम केलं, पण मोहीम म्हणून हातात काम घेतलं पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना काही काम पत्रकारांसाठी करता आलं. सगळे प्रश्न पत्रकारांची सुटले अस नाही पण प्रयत्न करतोय, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
 
पत्रकारांच्या घराच्या प्रश्नाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पत्रकारांच्या घरासाठी काही जिल्ह्यात काम केलं, पण मोहीम म्हणून हातात काम घेतलं पाहिजे. म्हाडामध्ये काही जणांना घर दिली. मीडिया टॉवर सारखी कमी किंमतीत घर करता आली तर काम करा असं अधिकारी यांना सांगितल्याचं फडणवीस म्हणाले.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply