Desh Videsh : हेडफोन आणि मोबाइल ठरलं मृत्यूचं कारण; रेल्वे ट्रॅकवर बसलेला विद्यार्थी ट्रेनखाली चिरडला, कुटुंबानं एकुलता मुलगा गमावला

 

Desh Videsh : हेडफोन आणि मोबाइल याचा गरजेपेक्षा अधिक वापर विद्यार्थी आणि तरुणांसाठी घातक ठरत आहे. अनेक उदाहरणांमधून हे समोर आलेलं आहे. भोपाळमध्ये हेडफोन आणि मोबाइलमुळे एका २० वर्षीय विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. रेल्वे रुळावर मोबाइलवर व्हिडीओ पाहण्यात तल्लीन झालेल्या मनराज तोमर या विद्यार्थ्याला ट्रेनने चिरडले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. मनराज कानात हेडफोन घालून बसल्यामुळे त्याला ट्रेनचा आवाजही कळला नाही आणि तो रुळावरच बसून राहिल्यामुळे सदर दुर्दैवी घटना घडली. मानराज हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, मानराज तोमर हा बीबीएचा विद्यार्थी होता. रात्री साडे तीन वाजता तो आपल्या मित्रांसह रेल्वे रुळावर फिरायला गेला. तिथेच एका समांतर रेल्वे ट्रॅकवर तो आणि त्याचे मित्र मोबाइलवर रिल पाहण्यात दंग झाले होते. त्याचा मित्र वेगळ्या रुळावर तर मानराज दुसऱ्या रुळावर बसला होता. त्यामुळे मानराज मित्र बचावला. पण मानराजच्या अंगावरून ट्रेन गेल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Pune : दिवाळी अशी करा साजरी, महापालिकेने का केले हे आवाहन

घटनास्थळी उपस्थित असलेल्या मानराजच्या मित्राने अपघात झाल्यानंतर याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाला दिली. त्यानेच पोलिसांना सांगितले की, ते दोघे रात्री रेल्वे रुळावर बसून सोशल मीडियावर व्हिडीओ पाहत होते. या दोघांनाही रिल बनविण्याचा छंद होता. मानराजने कानात हेडफोन घातल्यामुळे त्याला ट्रेनचा हॉर्न ऐकू आला नाही आणि पुढे अनर्थ घडला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. मानराज हा एकुलत एक मुलगा असून त्याच्या वडिलांना हृदयाशी संबंधित आजार आहे. त्यामुळे त्यांना अपघातनंतर लगेचच याची माहिती देण्यात आली नव्हती, अशी माहिती मिळत आहे. अवघ्या वीस वर्षांचा मानराज हा अभ्यासात हुशार विद्यार्थी होता. त्याला बॉडी बिल्डिंग आणि रिल बनविण्याचा छंद होता. मात्र हेडफोन आणि मोबाइलच्या अधीन गेल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply