Desh Videsh : इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत ३ टक्क्यांनी वाढ; भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Desh Videsh  : इस्रायल-हमास, इस्रायल-हेझबोला यांच्यातील युद्धानंतर आता इस्रायल-इराण युद्ध पेटलं आहे. इराणने मंगळवारी (१ ऑक्टोबर) रात्री इस्रायलची राजधानी तेल अविववर मोठा हल्ला केला आहे. इराणने इस्रायलवर २०० बॅलिस्टिक क्षेपणास्रे डागल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या संघर्षाचा परिणाम कच्चा तेलाच्या किंमतीवर बघायला मिळतो आहे. इराणच्या हल्ल्यानंतर कच्चा तेलाच्या किंमतीत जवळपास ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इराणच्या हल्ल्यानंतर कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ

रॉटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात ग्लोबल बेंचमार्क ब्रेंट क्रूडचे दर २.६ टक्क्यांनी म्हणजेच १.८६ डॉलरने वाढून ७३.५६ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. तर वेस्ट टेक्सॉस इंटरमीडिएट क्रूडचे दर प्रति बॅरल २.४ टक्क्यांनी म्हणजे १.६६ डॉलरने वाढून ६९.८३ डॉलरने पर्यंत वाढले आहेत. या हल्ल्याचा परिणाम फक्त क्रूड ऑईलवरच नाही, तर शेअर बाजारावरही पडला आहे. जगभरातील अनेक शेअर बाजारात घसरण झाल्याचं बघायला मिळालं आहे.

Sangli : मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्याकडे महायुतीतील भाजप, राष्ट्रवादीची पाठ

भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता

साधारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव वाढले, तर त्याचा परिणाम भारतील पेट्रोल-डिझेलच्या दरावर होतो. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर वाढल्याने भारतील तेल वितरक कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर वाढवू शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे याची झळ भारतीयांना बसण्याची शक्यता आहे.

इराणचा इस्रायलवर हल्ला

मंगळवारी रात्री इराणने इस्रायलमधील अनेक ठिकाणी २०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. याशिवाय इस्रायलची राजधानी तेल अवीव जवळील जाफामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच इस्रायलही इराणला जशास तसं उत्तर देण्याची शक्यता आहे. “जो कुणी आमच्यावर हल्ला करेल, त्याला आम्ही हल्ल्याने उत्तर देऊ. तसेच इराणच्या हल्ल्याला आम्ही परतवून लावले आहे. या अपयशी हल्ल्याला लवकरच प्रत्युत्तर दिले जाईल. हमास आणि हेझबोलाची जी अवस्था केली आहे, तीच इराणची केली जाईल”, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply