Delhi Earthquake : दिल्ली-एनसीआरपासून उत्तर प्रदेशपर्यंत भूकंपाचे तीव्र धक्के; भीतीने लोक घराबाहेर पळाले!

नवी दिल्ली : दिल्ली-एनसआरसहित पूर्ण उत्तर भारतातील जमीन भूकंपाने जमीन हादरली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगणिस्तानमधील फैजाबाद सांगण्यात येत आहे. याचबरोबर पाकिस्तानातही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहे. 

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, रात्री १०:१७ वाजण्याचा सुमारास अफगणिस्तानपासून ९० किलो मीटर अतंरावर भूकंपाचे धक्के जाणवले. याचबरोबर नोएडामधील एका सोसायटीमधील नागरिक थेट घरातून बाहेर पळाले. ही लोक भूकंपाच्या धक्क्याने खूपच घाबरलेले होते. तसेच या भूकंपाच जीवितहानी झाल्याबद्दल माहिती समोर आलेली नाही.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, रात्री १०:१७ वाजण्याचा सुमारास अफगणिस्तानपासून ९० किलो मीटर अतंरावर भूकंपाचे धक्के जाणवले. याचबरोबर नोएडामधील एका सोसायटीमधील नागरिक थेट घरातून बाहेर पळाले. ही लोक भूकंपाच्या धक्क्याने खूपच घाबरलेले होते.तसेच या भूकंपाच जीवितहानी झाल्याबद्दल माहिती समोर आलेली नाही.

उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये भूकंपाचे कमी स्वरुपात भूकंपाचे धक्के जाणवले. या व्यतिरिक्त चमोली, उत्तरकाशीचं गंगा घाट, यमुना घाट, मसूरी, पंजाबचं मोगा, बठिंडा, मानसा, पठानकोट, उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद, सहारनपूर, शामली आणि जयपूरमधील काही भागातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले.

 

 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply