Delhi Cold Wave: दिल्ली गोठली! शहरात थंडीचा कहर, ऐतिहासिक १.५ डिग्री तापमानाची नोंद

नवी दिल्ली : हिमालयात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असल्यानं सध्या उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. याचा मोठा परिणाम दिल्ली शहरात जाणवत असून सध्या हे शहर गोठल्याचीच स्थिती आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, दिल्लीत आत्तापर्यंतच्या सर्वात कमी १.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याचे वैज्ञानिक डॉ. आर. के. जेनामनी म्हणाले, दिल्ली सध्या गोठली असून अजूनही थंडीची लाट कायम आहे. अद्यापही दिल्लीच्या किमान तापमानात घट होताना दिसत आहे. तीनच दिवसांपूर्वी दिल्लीचं तपमान ४ डिग्री सेल्सिअसवर होतं त्यात आज आणखी घट झाली असून दिल्ली विद्यापीठाच्या भागात १.५ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. तसेच शहरातील लोधी रोड भागात २ डिग्री तर सफदरजंग भागात २.२ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, उर्वरित उत्तर भारतातही थंडीची लाट असून राजस्थानातील चुरू, हरयाणातील हिस्सार आणि उत्तर प्रदेशातील बरेली या ठिकाणी अतिथंडीची लाट आहे. या तिन्ही टिकाणी २ डिग्री तापमानाची नोंद झाल्याचंही डॉ. जेनामनी यांनी सांगितलं.

त्याचबरोबर दिल्लीच्या विविध भागांमध्ये दाट धुक्याची स्थिती सध्या कमी होत आहे. सातत्यानं तापमानात मोठी घट होत असल्यानं पंजाब, हरयाणा, पश्चित उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीमध्ये पुढील २४ तासांसाठी रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply