Delhi AIIMS Hospital Fire : दिल्लीतील एम्स रुग्णालयात भीषण आग, फायर ब्रिगेडच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल

Delhi AIIMS Hospital Fire : दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एम्स रुग्णालयातील एमर्जन्सी वॉर्डमध्ये आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आग लागल्यामुळे एम्स रुग्णालयामध्ये एकच गोंधळ उडाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एम्स रुग्णालयाच्या एन्डोस्कोपी विभागात दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागली. आग लागल्यामुळे एम्स रुग्णालयात रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टरांची पळापळ झाली. रुग्णालयातील रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांनासुखरूप बाहेर काढण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीचे कारण अस्पष्ट आहे.

Shasan Aplya Dari Jejuri : मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस, अजित पवार जेजुरी गडावर! खंडेरायाचं घेतलं दर्शन

एम्स रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील एन्डोस्कोपी रुममध्ये ही आग लागली. याठिकाणी पूर्वी ओपीडी व्हायची. ही रुम आपत्कालीन वॉर्डच्या शेजारीच आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १२ च्या सुमारास आग लागल्याचा कॉल आला. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या वॉर्डमध्ये अडकलेल्या लोकांना तात्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply