Pune : श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त आजपासून देहू, तळवडे, चाकण परिसरातील वाहतुकीत बदल

Pune : जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३७५ व्या सदेह वैकुंठगमन अमृतमहोत्सव सोहळ्याचा शुभारंभ येत्या २७ मार्चला श्रीक्षेत्र देहूगाव येथे लाखो वारकरी, भाविक भक्तांच्या उपस्थित होणार आहे. यानिमित्त पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने २५ ते २७ मार्चपर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत. या काळात सर्व प्रकारांच्या वाहनांना देहूनगरीत प्रवेश बंद असणार आहे. तर देहूगाव मध्ये येण्यासाठी भाविकांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केले आहे. तळवडे म्हाळुंगे चाकण वाहतूक विभाग यांच्या वतीने हा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Lok Sabha Election 2024 : निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, राजू पारवे यांचा शिंदे गटात प्रवेश; या मतदारसंघातून मिळणार उमेदवारी?

वाहतूक व्यवस्था

देहूगाव कमान (जुना पुणे-मुंबई महामार्ग) येथून देहूगावकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे. (सार्वजनिक वाहतूक बसेस दिंडीतील वाहने वगळून).

महिंद्रा कंपनीकडून फिजुत्सु, कॉर्नर अथवा कॅनबे चौक आयटी पार्क चौकाकडे येणा-या सर्व प्रकारांच्या वाहनास प्रवेश बंद करण्यात आला आहे. (पर्यायी मार्ग : महिंद्रा सर्कल ते निघोजे ते मोई फाटा मार्गे डायमंड चौक मार्गे इच्छितस्थळी जातील).

तळेगाव-चाकण रोडवरील देहूगाव फाटा येथून देहूगाव येथे जाणाऱ्या रस्त्यावरून सर्व प्रकारांच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. (पर्यायी मार्ग : सदर मार्गावरील वाहने एच. पी. चौक मार्गे इच्छितस्थळी जातील)

नाशिक-पुणे महामार्गावरील वाहने चाकण-तळेगाव चौक तसेच स्पायसर चौक येथून महिंद्रा सर्कल मार्गे आयटी पार्क, कॅनबे चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारांच्या अवजड अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली आहे. (पर्यायी मार्ग या मार्गावरील वाहने ही मोशी भारतमाता चौक मार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील किंवा महिंद्रा सर्कल इण्डुरन्स चौक, एच. पी. चौक मार्गे इच्छित स्थळी जावू शकतील)

देहू मुख्य कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारांच्या वाहनांनासाठी बंद राहणार आहे.

खंडेलवाल चौक ते देहकमान (मुख्य) ते परंडवाल चौक हा रस्ता सर्व प्रकारांच्या वाहनांनासाठी बंद राहणार आहे.

जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक) ते झेंडेमळा जकात नाक्याकडे जाणार्या वाहनांसाठी वन वे मार्ग करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply