Dehu Road : देहूरोड तलाठी कार्यालय आठवड्यापासून कुलूपबंद; नागरिक संतप्त

Maval News : मावळ येथील देहुरोड असलेले किवळे रावेत तलाठी कार्यालय गेल्या सात ते आठ दिवसापासुन बंद राहिले आहे. यामुळे परिसरातील शेतकरी तसेच अन्य ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. 

तलाठी कार्यालयात सात बारा काढणे, नोंदी करणे, वारस नोंद , उत्पन्नाचा दाखला काढ़णे अशा विविध कामासाठी नागरिक रोज किवळे तलाठी कार्यालयाकड़े येतात. परंतु कार्यालय बंद असल्याने नागरिकांची, शेतक-यांची कामे ठप्प झाली आहेत. तसेच त्यांना हेलपाटा पडत असल्याने आर्थिक भुर्दंड साेसावा लागत आहे.

मागील आठवड्यात याच कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी एका खासगी कार्यालयीन कर्मचाऱ्याला पस्तीस हजाराची लाच मागताना रंगेहाथ पकडले. तेव्हापासुन हे तलाठी कार्यालय बंदच राहिले आहे. दरम्यान चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या कामात सर्व कर्मचारी व्यस्त आहेत. त्यामुळे देहूरोड तलाठी कार्यालय बंद असल्याचे हवेली तहसीलदार गीता गायकवाड यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply