Dasara Melava : 'आझाद मैदानावर इव्हेंट असेल अन् शिवाजी पार्कवर...'; दसरा मेळाव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा शिंदे गटावर हल्लाबोल

Dasara Melava : दसरा मेळाव्यावरून यंदाही शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. यंदा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे. तर शिंदे गटाचा मुंबईच्या आझाद मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही गटांच्या मेळाव्याची जागा निश्चित झाली असली तरी नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. याच दसरा मेळाव्यावरून ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. अनिल परब म्हणाले ,'दसरा मेळावा आमच्यासाठी मोठा असतो. त्या अनुषंगाने आज बैठकीत चर्चा झाली'.

Maratha Aarakshan : सरकारला आज शेवटची विनंती, २५ ऑक्टोबरनंतर पेलवणार असं आंदोलन करु : मनोज जरांगे

'कार्यकर्ते आणि मेळाव्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी वाहतूक व्यवस्था, पाणी, शौचालय या सगळ्याची व्यवस्था केली आहे. मेळावा शांततेत पार पडावा, याबाबत पोलिसांसोबत देखील समन्वय साधला आहे. मेळाव्याच्या नियोजनाबाबत उद्याच्या सामनातून सूचना केल्या जातील', असे ते म्हणाले.

शिंदे गटावर टीका करताना अनिल परब म्हणाले, 'आझाद मैदानावर इव्हेंट असेल. तर दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होईल. कारण त्याला बाळासाहेब ठाकरेंची परंपरा आहे. शिवसेना ही मर्दांची आहे, असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे'.

'दसरा मेळाव्याला उद्याची गर्दी पाहून कळेल, कोणाचा मेळावा आहे. त्यांना आझाद मैदानावर मेळावा घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी मेळावा घ्यावा. ताकदची बघायची असेल तर निवडणुका घ्या', असे अनिल परब म्हणाले.

मराठा आरक्षणावर भाष्य करताना अनिल परब म्हणाले, 'मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना एक महिना झुलवत ठेवलं. आता त्यांना अंदाज आला असेल. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने उपोषणाला बसतील'.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply