Dandapatta As State Weapon : शिवजंयतीदिनी दांगपट्ट्याला राज्यशस्त्राचा दर्जा मिळणार, सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Dandapatta As State Weapon : दरवर्षी आपण 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतो. यंदा देखील शिवजयंती उत्साहात पार पडणार आहे. सगळीकडे शिवजयंतीची तयारी सुरू आहे. आग्र्यात देखील शिवजयंती साजरी केली जाणार आहे. आग्र्यात शिवजयंती साजरी करून त्याच दिवशी दांडपट्टा हे राज्यशस्त्र म्हणून घोषित केले जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. 

19 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार आग्रा दौऱ्यावर आहेत. आता दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून नवी ओळख निर्माण होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

Supriya Sule : 'कुछ रिश्ते दिल से बनते हैं'; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा

दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणार

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आग्र्यात रात्री ८ वाजता लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. आग्र्यात पार पडणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व अजित पवार, सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवर उपस्थित राहणार आहेत.

औरंगजेबाने आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भरदरबारात अपमान केला होता. आग्र्यात त्याच दरबारात आता येत्या सोमवारी 'जय शिवाजी-जय भवानी' या घोषणांचा जयघोष होईल. त्यानंतर शिवजयंतीच्या निमित्ताने ऐतिहासिक दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

शिवराज्याभिषेकाचं यंदाचं ३५० वे वर्ष

दांडपट्ट्याला राज्यशस्त्र जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. शिवराज्याभिषेकाचं यंदाचं ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने शिवजयंतीच्याच दिवशी दांडपट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचं प्रेरणास्थान आहे. राज्यात देखील सगळीकडे शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते. आता सगळीकडे शिवजयंतीची तयारी सुरू असल्याचं चित्र 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply