Dahi Handi 2023 : मुंबईत दहीहंडी फोडताना 2 गोविंदा जखमी, दोघांवर केईएम-राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जात आहे. मात्र आनंदात काहीशी काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत दहीहंडी फोडताना दोन गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Talathi Viral Video: दारु पिऊन कार्यालयात आला, सातबाऱ्यावर सही करताना खुर्चीवरुन पडला; मद्यधुंद तलाठ्याचा VIDEO

आज राज्यभरासह मुंबईत दहीहंडी उत्सव जोरात साजरा केला जात आहे. विविध ठिकाणी दहीहंड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दहीहंडी उत्सवनिमित्ताने महानगरपालिकेचे सगळे रुग्णालय अॅक्शन मोडवर आहेत. दहीहंडीचे मनोरे रचताना अनेक बाळगोपाळांना दुखापत होते, त्यानुळे महापालिका सतर्क आहे. आतापर्यंत मुंबईत दोन गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.त्यातील एक गोविंदा केईएम रुग्णालयात आणि एक राजवाडी रुग्णालयात आहेय. दोघांचीही परिस्थिती चिंताजनक नसल्याची माहिती मिळाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply