Dahi Handi 2023 : राज्यातील गोविंदांना सरकारकडून मोठं गिफ्ट, विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर

Mumbai : राज्यातील गोविंदांसाठी आनंदाचा बातमी आहे. राज्य सरकारने गोविंदांच्या विम्यासाठी १८ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. ही शासकीय विमान कवच योजना ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे राज्यातील गोविंदा पथकाने स्वागत केले आहे.

दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीगसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील ७५ हजार गोविंदांना हे विमा संरक्षण मिळणार आहे. राज्यातील गोविंदांसाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचलंत त्यांना विमासंरक्षण दिले आहे. राज्य सरकारने गोविंदांसाठी १८ लाख ७५ हजारांची विमा कवच योजना जाहीर केली आहे. सरकारची ही योजना ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत असणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रियांना मंजूरी देत राज्य सरकारने शासकीय आदेशांना मंजुरी दिली आहे.

Chandrayaan 3 Updates: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजन असल्याचे पुरावे; इस्त्रोने दिली मोठी अपडेट

महत्वाचे म्हणजे, मागच्या वर्षी राज्य सरकारने ५० हजार गोविंदांना विमा कवच दिले होते. आता या गोविंदांची संख्या वाढवण्यात आली असून यावर्षी ७५ हजार गोविंदांना विमा कवच मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे गोविंदा पथकांकडून स्वागत करण्यात आले असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने गोविंदा पथकांकडून विमा संरक्षणाविषयी करण्यात आलेली मागणी मान्य केली होती. यासंदर्भात शासन निर्णय क्रीडा विभागातर्फे जारी करण्यात आला होता.

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात दहीहंडी उत्सव तसेच प्रो-गोविंदा लीग स्पर्धा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येतात. या उत्सव आणि स्पर्धेत हजारो गोविंदा आणि गोपिका सहभागी होत असतात. दहिहंडी हा साहसी खेळ असल्याने तो खेळताना गोविंदांना अपघात होतात, त्यामुळे रुग्णालयात दाखल करुन वैद्यकीय उपचारांची गरज पडते. प्रसंगी गोविंदांचा मृत्यूही होतो. अशा परिस्थितीत गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर सरकारने गोविंदांची ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे गोविंदा पथकांना दिलासा मिळाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply