Cyber Crime : सायबर गुन्हेगारांची नवी शक्कल; राष्ट्रीयकृत बँकेचे नाव आणि लोगो वापरून नागरिकांची फसवणूक

Cyber Crime : सायबर क्राईमच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा रात्रं-दिवस काम करत आहेत. मात्र चोरट्यांकडून विविध थक्क करणाऱ्या मार्गाने चोरी केली जात आहे. अशीच आणखी एक घटना आता समोर आलीये.

लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांची नवी शक्कल शोधली आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे नाव आणि लोगो वापरून लोकांना फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. व्हॉट्सअॅपद्वारे पैशांचे आमिष दाखवत लिंक आणि app शेअर करण्यास सांगितलं जातंय. लिंकवर क्लिक करताचअचानकपणे व्हॉट्सअॅपमधील ग्रुपचे लोगो बदलून बँकेचे लोगो DP म्हणून सेट केले जातायत.
 
यापासून आपला बचाव करण्यासाठी नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. व्हॉट्सअॅप, लाईटबील अन् अशा विविध मार्गांतून सायबर चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे अनोळखी फोन नंबर किंवा अनोखळी लिंक दिसल्यास लगेचच त्यावर क्लिक करू नये, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

पुणे शहरात साधारण एका दिवसाला ४१ सायबर क्राईमच्या तक्रारीपुणे शरहात तर एका दिवसात ४१ सायबर क्राईमच्या तक्रारींची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्याची आकडेवारी पाहिली तर एका महिन्यात १२४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. २५० हून अधिक तक्रारी आणि ३ कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply