Cyber Crime : ऑनलाईन लुटमार करणाऱ्या भाऊ- बहिणीला अटक; ४८ चेकबुक, एटिएम कार्ड जप्त

Cyber Crime :  शहरातील एका तरुणाला २७ डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत सोशल मीडिया व व्हॉटसऍप क्रमांकावरुन संपर्क व मेसेज चॅटींग करुन रसायन खरेदी विक्रीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखविले.  झटपट पैसा दुप्पट करण्याच्या योजनेतून तक्रारदाराचा भरवसा जिंकत ५ लाख ६४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्या प्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा दाखल होता. या दाखल गुन्ह्यात सायबर पोलिसांनी भिलवाडा (राजस्थान) येथून संशयित भाऊ-बहिणीच्या जोडीला अटक केले आहे.

जळगाव सायबर ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या पथकाने गुन्हा घडल्यापासून तपास सुरु केला. संबधीत बँक व मोबाईल कंपनी यांचेकडे पत्रव्यवहार करुन माहीती प्राप्त केली. माहितीच्या आधारे संशयित सायबर गुन्हेगार चंदाकुमारी उर्फ तानिया सत्यनारायण शर्मा (वय ३०) व भरत सत्यनारायण शर्मा (वय२७, रा. भिलवाडा, राजस्थान) या दोघांना राजस्थान राज्यातील भिलवाडा येथील असल्याचे निष्पन्न झाले. 

Nitesh Rane : तेव्हा संजय राऊतांचा भाऊ अमित भाईंच्या घराभोवती किती फिरायचा, फोटो दाखवावे लागतील, नितेश राणेंचा इशारा

राजस्थानमधून केली दोघांना अटक 

जळगाव पोलिसांच्या पथकाने राजस्थानातील भिलवाडा येथे शास्त्रीनगर येथून अटक केली. अटकेतील दॊघेही भाऊ- बहिण असून त्याच्या ताब्यातून ४८ वेगवेगळ्या बँकेचे चेकबुक, २० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड, वेगवेगळ्या कंपनीचे २ मोबाईल फोन, ५ सिमकार्ड असे पुरावे आणि दस्तऐवज पोलिस पथकाने जप्त केले आहे. संशयितांना जिल्‍हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांची ५ दिवसांच्या कोठडीत रवानगी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply