बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. आज (६ ऑगस्ट) स्पर्धेच्या नवव्या दिवशी अॅथलेटिक्समध्ये भारताला दोन ऐतिहासिक पदकं मिळाली. महिलांच्या दहा हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत प्रियांका गोस्वामीने रौप्य पदक जिंकले. यानंतर मराठमोळ्या अविनाश साबळेने तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये रौप्यपदक पटकावले.
अविनाश साबळेने पुरुषांच्या तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. त्याने ८.११.२० मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. यासह त्याने तीन हजार मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला. अविनाश हा सुवर्णपदक विजेत्या अब्राहम किबिव्होटपेक्षा फक्त ०.५ सेकंद मागे होता. केनियाच्या अब्राहमने ८.११.१५ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली.
प्रियांकाने महिलांच्या १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. तिने ४३.३८ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने ४२.३४ मिनिटांची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. या शर्यतीत पहिली चार मिनिटे प्रियांका आघाडीवर होती. मात्र, नंतर ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने आघाडी घेत सुवर्णपदक जिंकले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून प्रियंकाचे कौतुक केले आहे.
अविनाश आणि प्रियंकाच्या दोन पदकांसह भारताने सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये चार पदके जिंकली आहेत. या दोघांपूर्वी तेजस्वीन शंकरने उंच उडीत आणि मुरली श्रीशंकरने लांब उडीत पदके जिंकली होती. तेजस्वीनने कांस्य तर श्रीशंकरने रौप्यपदक जिंकले होते. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत २९ पदके जिंकली आहेत, ज्यात नऊ सुवर्ण, ११ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे.
शहर
- Gokhale Bridge : मुंबईकरांना खुशखबर, अंधेरीचा गोखले पूल झाला खुला, वाहतूककोंडी फुटणार
- Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Mumbai : मुंबई एअरपोर्टवर ड्रोनच्या घिरट्या, परिसरात भीतीचे वातावरण; पोलिसांकडून शोध सुरू
महाराष्ट्र
- 10th SSC Result : मोठी बातमी! दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
- Sangli : घराच्या मोकळ्या जागेवर गांजा लागवड; १० किलो गांजाची २३ झाडे जप्त
- Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ
- MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री
गुन्हा
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
- Pune : समाज माध्यमातील ओळखीतून तरुणीवर बलात्कार; हडपसर पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा
- Pune : पाषाण भागात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड- चौघांविरुद्ध गु्न्हा
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Operation Sindoor : पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू
- India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट
- Pakistan : पाकिस्तानचे २ तुकडे होणार! बलुच नेत्याकडून संयुक्त राष्ट्रांकडे स्वतंत्र देश करण्याची मागणी
- India Pakistan War : आमचा काही संबंध नाही..., पाकिस्तानला अमेरिकेचा दणका, भारताला दिला पाठिंबा