CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

ऋतुराज गायकवाड आणि डॅरेल मिचेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. मिचेल अर्धशतक ठोकून बाद झाल्यानंतर ऋतुराजने डावाची सूत्रे हातात घेत संघाला 17 षटकात 175 धावांच्या पार पोहचवलं. दरम्यान तो 90 धावांपर्यंत पोहचला

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

ऋतुराज गायकवाडने 27 चेंडूत अर्धशतक ठोकत चेन्नईचा डाव सावरला. त्याने डॅरेल मिचेलसोबत भागीदारी रचत संघाला 10 षटकात शतकाच्या जवळ नेऊन ठेवलं.

 ऋतुराजने गिअर बदलला

अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर ऋतुराजने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यानं 7 षटकात 59 धावा करत सीएसकेची गाडी रूळावर आणली.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

भुवनेश्वर कुमारने सीएसकेला पहिला धक्का दिला. त्याने अजिंक्य रहाणेला 9 धावांवर बाद केलं.

IPL 2024 LSG Vs RR : राजस्थानच्या 'बुलेट ट्रेन'ला लखनौचे 'नवाब' लावणार ब्रेक; काय असेल दोन्ही संघाची प्लेइंग-11?

पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली. 

पॅट कमिन्सने सीएसकेविरूद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

हेड टू हेड : CSK vs SRH 

सीएसके आणि हैदराबाद हे दोन्ही संघ आतापर्यंत 20 वेळा आयपीएलमध्ये एकमेकांना भिडले आहेत. त्यातील 14 वेळा सीएसकेने सामना जिंकला असून 6 वेळा हैदराबादनं सीएसकेला मात दिली आहे.

Chennai Super Kings Vs Sunrisers Hyderabad Live IPL 2024 : 

चेन्नई सुपर किंग्जने सनराईजर्स हैदराबादचा 78 धावांनी पराभव केला. हा हैदराबादचा धावांच्या बाबतीतला आयपीएलमधील सर्वात मोठा पराभव ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने 20 षटकात 3 बाद 212 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 134 धावा करून गारद झाला. सीएसकेकडून तुषार देशपांडेने 3 षटकात 4 विकेट्स घेतल्या. तर मुस्तफिजूर आणि पथिरानाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. हैदराबादकडून मार्करमने सर्वाधिक 32 धावांचे योगदान दिले.

नाणेफेक गमावल्यामुळे प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या चेन्नई सुपर किंग्जने सनराईजर्स हैदराबादविरूद्ध 20 षटकात 3 बाद 212 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने 98 धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र त्याचं शतक अवघ्या 2 धावेने हुकले. त्याने डॅरेल मिचेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची शतकी भागीदारी रचली.

स्लॉग ओव्हरमध्ये शिवम दुबेने तडाखेबाज खेळी करत 20 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या. तर धोनीने 2 चेंडूत 4 धावा केल्या. हैदराबादकडून टी नटराजन, भुवनेश्वर कुमार आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply