CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

CSK Playoffs Scenario IPL 2024 : पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 7 विकेटने पराभव केला आहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला.

या सामन्यात सीएसके संघाने प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जला 163 धावांचे लक्ष्य दिले, ज्याचा पंजाब किंग्जने सहज पाठलाग केला. आता या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मोठा धक्का बसला असून आता त्यांच्याकडे प्लेऑफमध्ये जाण्याचा एकच मार्ग शिल्लक आहे.

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत 10 पैकी पाच सामने जिंकले आहेत. संघाला पाच सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाचे 10 गुण असून ते चौथ्या स्थानावर आहे. चेन्नईचे अजून चार सामने बाकी आहेत, जे त्याला पंजाब किंग्ज, RCB, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स विरुद्ध खेळायचे आहेत.

CSK Vs PBKS IPL 2024 : प्ले-ऑफसाठी रस्सीखेच! चेन्नईशी आज भिडणार पंजाब; कोण मारणार बाजी?

चेन्नई सुपर किंग्जला आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी किमान 16 गुण आवश्यक आहेत. या कारणास्तव, प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला उर्वरित चारपैकी तीन सामने जिंकावे लागतील. जेणेकरून ते प्लेऑफमध्ये आपले स्थान आरामात पक्के करू शकेल आणि नेट रन रेटही वाढवावा लागेल. सध्या चेन्नईचा नेट रन रेट 0.627 आहे.

एकापेक्षा जास्त सामने हरले तर त्यांचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न भंगेल आणि ते स्पर्धेतून बाहेर पडतील. यावेळी 14 गुणांसह प्लेऑफमध्ये जाणे फार कठीण दिसत आहे.दुसरीकडे पंजाब किंग्जने या विजयानंतर प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. संघाचे अजून 4 सामने बाकी आहेत आणि जर त्यांनी चारही सामने जिंकले आणि त्यांचा नेट रनरेट चांगला राहिला तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये जातील. मात्र, एकही सामना गमावल्यास पंजाब किंग्जसाठीही प्लेऑफचे दरवाजे बंद होतील. पंजाब किंग्जच्या या विजयामुळे गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्ससारख्या संघांवरील धोका वाढला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply