Crime News : आधी बारमध्ये गेले, व्हिडीओ शूट केला मग धाड मारली; मुंबई पोलिसांची धडक कारवाई, 54 महिलांचा सुटका

Crime News : बोरिवलीतील जश्न रेस्टॉरंट अँड बारवर समाज सेवा शाखेकडून धाड टाकण्यात आली आहे. यामध्ये ५४ महिलांची सुटका करण्यात आलीये. कारवाईवेळी डान्सबारमध्ये नृत्य करणाऱ्या महिलांवर पैश्यांची उधळपट्टी सुरू होती.

कारवाई दरम्यान, ३.२१ लाख रुपयांची रोकड, ध्वनिक्षेपक, अप्लिफायर लॅपटॉप जप्त करण्यात आलं आहे. पोलिसांनी ५० ग्राहकांसह एकूण ६९ आरोपींना अटक देखील केलीये. मॅनेजर, कॅशियर आणि वेटर यांना देखील अटक करण्यात आली आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Railway : रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर धडक कारवाई; पुण्यात 6 लाखांचा दंड वसूल

समाज सेवा शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, दौलत नगर येथील जश्न रेस्टॉरंट अँड बारमध्ये विनापरवाना नृत्य चालवलं जातंय. शनिवारी रात्री समाज सेवा शाखेचे कार्यकर्ते कस्तुरबा पोलीस ठाण्यात गेले आणि स्थानिक पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर पोलिसांची माणसे ग्राहकाच्या वेशात तेथे पोहचले.

त्यांनी तेथे सुरु असलेला प्रकार गुपचूप आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. काढलेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत होते की, बारमध्ये महिला नाचत होत्या आणि त्यांच्यावर पैसे उधळले जात होते. शहानिशा झाल्यानंतर समाज सेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी (एस एस ब्रांचच्या) पोलिसांच्या मदतीने तेथे छापा टाकला.

कारवाईत ५४ महिलांची सुटका केली तर ५८ जणांना अटक केली. या प्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात सरकारी नियमांच उल्लंघन करणे आणि महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार) यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम(२०१६) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply