Crime News : बहिणीचा जास्त लाड पाहून भावाच्या डोक्यात सैतान झाला जागा; चित्रपटाच्या सीनप्रमाणे चेहराच ठेचला

Crime News : एका १३ वर्षांच्या मुलानं आपल्या ५ वर्षांच्या मामेबहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संतापजक घटना नालासोपारातील परिसरात घडली आहे. कुटुंबातील प्रत्येकजण आपल्या मामेबहिणीचे लाड करत असल्यामुळे भावानं आपल्या बहिणीची हत्या केली आहे. रागाच्या भरात त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मुलाला ताब्यात घेतलं असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान हे नालासोपारा पूर्व येथील श्रीराम नगर येथे राहतात. त्यांना २ मुली आहेत. त्यांची बहीण त्यांच्या घरासमोरच राहते. कामावरून येताना त्यानं आपल्या लहान मुलीला शाळेतून आणले. सायंकाळी खेळायला गेली. परंतु ती पुन्हा घरी परतलीच नाही.

चिमुकली घरी परतल्यामुळे तिचा शोध घेण्यात येत होता. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये खान यांचा मुलगा चिमुकलीला घेऊन जात असल्याचे निर्दशनास आले. मुलाकडे चौकशी केली असता, एका अज्ञात व्यक्तीनं चिमुकलीला मारल्याचं सांगितले.

ATM Card Fraud : फेविक्विक टाकून एटीएममधून काढायचे रक्कम; ग्राहकांची फसवणूक करणारा एकजण ताब्यात

घाबरलेल्या कुटुंबाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मुलीचा तपास केला असता, मुलीचा मृतदेह श्रीराम टेकडीवर आढळला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी मुलाची चौकशी केली. सुरूवातीला त्यानं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्यानं गुन्हा कबुल केला.

कुटुंबातील प्रत्येक जण आपल्या बहिणीचे लाड करतात. याच रागातून त्यानं तिला संपवलं. अल्पवयीन मुलाने दिलेल्या माहितीनुसार, हत्येपूर्वी त्यानं रमन राघवन २ हा चित्रपट पाहिला होता. त्यानं आधी मामे बहिणीला डोंगरावर नेलं नंतर गळा आवळून हत्या केली, नंतर दगडानं चेहरा ठेचला. या प्रकरणानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply