Crime News : लग्नाचे आमिष दाखवून मामाच्या मुलीवर बलात्कार, व्हिडिओ शूट करून करायचा ब्लॅकमेल

Crime News : एका तरूणानं लग्नाचे आमिष दाखवून आपल्याच मामाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. ब्लॅकमेल करून नराधम वारंवार मुलीचे शोषण करत होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला क्रिकेट खेळत असताना ताब्यात घेतलं आहे. ही संतापजनक घटना राजस्थानमधील अलवरमधील रामगड भागातील नौगंवा पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच, अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी नौगंवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा मुलीच्या वडिलांचा दूरचा नातेवाईक आहे, म्हणूनच तो त्यांच्या घरी येत असे. याचा फायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याने वारंवार अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.


पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. याशिवाय, पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. प्रत्येक बाजूने प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एएसआय मुसद्दीलाल यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vande Bharat Express : मोदी सरकारची मोठी घोषणा! कटरा-श्रीनगर मार्गावर लवकरच धावणार वंदे भारत

क्रिकेट खेळत असताना केली अटक

पोलीस पथकाने जयपुरमध्ये क्रिकेट खेळत असताना त्याला घेरले आणि आरोपीला अटक केली. पोलिसांना पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पण पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा पीडितेचा दूरचा नातेवाईक आहे. आरोपीने मुलीचे शोषण केले आणि तिचे अश्लील व्हिडिओ बनवले. ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply