Crime News : त्यानं ब्लॅकमेल केलं, शारीरिक संबंध ठेवताना तिनं शेजाऱ्याचा गळा आवळला

 

Crime News :शेजारचा तरूण वारंवार ब्लॅकमेल करत होता. ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवत होता. याच त्रासाला कंटाळून शारीरिक संबंध ठेवत असताना महिलेनं तरूणाचा गळा आवळला. ज्यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना यूपीच्या बरेलीमध्ये घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच रविवारी महिलेला अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

बरेलीच्या भोजीपुरा पोलीस ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेजारच्या एका तरूणानं विवाहितेला ब्लॅकमेल केलं. नंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. याच त्रासाला कंटाळून महिलेनं शारीरिक संबंध ठेवत असताना तरूणाचा गळा आवळून हत्या केली आहे. पोलीस अधिक्षक मुकेश चंद्र मिश्रा यांनी सांगितले की, ३० जानेवारीला भोजीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घूर समासपूर गावात इक्बाल (वय वर्ष ३२) याचा मृतदेह सापडला होता.

Pen Ashram School : पेण आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्‍यू; मुख्याध्यापक, अधीक्षकास नोटीस

या प्रकरणी इक्बालच्या पत्नीनं महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी रबिनाला ताब्यात घेतलं आहे. तिने इक्बालच्या हत्येची कबुली दिली. रबिनानं सांगितले की, इक्बाल आणि रबिना या दोघांमध्ये दररोज फोनवर बोलणं व्हायचं. त्यानं कॉल रेकॉर्ड केले आणि कॉल रेकॉर्डच्या नावाखाली बऱ्याचदा ब्लॅकमेल केलं. इक्बालनं ब्लॅकमेल करून अनेकदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते.

इक्बालच्या याच कृत्याला कंटाळून रबिनानं शारीरिक संबंध ठेवत असताना गळा आवळून त्याची हत्या केली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर इक्बालच्या पत्नीनं पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी रबिनाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपी रबिनाला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply