Crime News : मामीच्या प्रेमात भाचा वेडापिसा, नात्याची चाहूल मामाला लागली, दोघांनी काढला काटा

Firozabad Murder News : मामी-भाचा, यांच्या प्रेमाची सध्या उत्तर प्रदेशमध्ये चोरदार चर्चा होतेय. मामीच्या प्रेमात पडलेल्या भाच्याने मामाचा काटा काढला, त्याला मामीने मदत केले. फिरोजाबादमधील या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. मामाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. या हत्याकांडात मामी आणि भाच्याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खैरगढ पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बैरानी गावात ४२ वर्षीय सत्येंद्र यांची हत्या करण्यात आली. सत्येंद्र यांची हत्या त्यांची पत्नी रोशनी आणि भाचा गोविंद यांनी मिळून केली. दोघांनी गळा दाबून सत्येंद्र याला संपवले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अखिलेश भदोरिया यांनी सांगितले की, पत्नी रोशनीने पत्नीच्या मृत्यूची माहिती शेजाऱ्यांना दिली होती. रोशनीने अचानक नवरा मेल्याचे शेजाऱ्यांना सांगितले होते.

मामी-भाच्याला ठोकल्या बेड्या -

सत्येंद्रचा मृत्यूवर सत्येंद्रच्या भावाला संशय आलाय. त्याच्या मनात प्रश्नांनी काहूर माजवले. त्याने थेट पोलीस स्टेशन गाठले. त्याने सत्येंद्रच्या मृत्यूबाबत पोलिसांना सूचना दिली, त्याशिवाय तक्रारही दाखल केली. पोलिसांनी सत्येंद्र याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवले, अन् चौकशी सुरू केली. सत्येंद्रने वहिणी रोशनी आणि भाचा गोविंद याच्यावर पोलिसांकडे संशय व्यक्त केला. पोलिसानी रोशनी आणि गोविंद यांची चौकशी केली, त्यात ते दोषी आढळले.

Beed News : बीडमध्ये चाललंय काय? महिला सरपंचाला मागितली एक लाख रुपयांची खंडणी

खाकीचा इंगा, आरोपींची कबुली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र यांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे पोस्टमार्टमच्या रिपोर्ट्समध्ये आलेय. पोलिसांनी रोशनी आणि गोविंद यांची कसून चौकशी केली. त्यांना खाकीचा इंगा दाखवल्यानंतर गुन्हा कबूल केला. सत्येंद्र याचा आम्ही खून केल्याचे रोशनी आणि गोविंद यांनी पोलिसांना जबाबत सांगितले.

अडथळा ठरला, कायमचा संपवला -

सत्येंद्रचा भाचा गोविंदा आणि त्याची पत्नी रोशनी यांच्यात अवैध प्रेमसंबंध होते. बायको आणि भाचा यांच्यातील प्रेमाबाबत सत्येंद्रला समजले. त्याने दोघांनाही समजूत घातली. पण त्यांच्यातील प्रेमप्रकरण सुरूच होते. सत्येंद्रचा अडथळा निर्माण झाला, त्यामुळे पत्नी आणि भाच्याने मिळून काटा काढला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे, पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply