Crime News : तिहेरी हत्याकांडानंतर नागभीड तालुका पुन्हा हादरला, जादूटाेणाच्या संशयातून वृद्धाची हत्या

Crime News : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या झाल्याचा प्रकार समाेल आला आहे. आसाराम दोनाडकर (वय 67) असं मृत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान 3 महिन्यांपूर्वी याच गावात एकाने स्वत:च्या दोन मुलींसह पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याचा प्रकार घडला हाेता.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा जमाव चाल करून गेला. जादूटोणा करतो म्हणून त्यांच्याशी जमावाने वाद घातला. दोनाडकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण देखील झाली.

Latur Crime : चोरी करताना पहिले म्हणून विद्यार्थ्यांचा दगडाने ठेचून खून; अहमदपूर तालुक्यातील धक्कादायक घटना

ही मारहाण ते बेशुद्ध होईपर्यंत झाली. काहींनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली. या प्रकरणी पाेलिसांनी संतोष जयघोष मैंद (वय 26), श्रीकांत जयघोष मैंद (वय 24), रुपेश देशमुख (वय 32) या संशियतांना अटक केली.

 
 
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *