Crime News : पुणे हादरले, सख्या मावस बहिणींवर ४ जणांनी केला सामूहिक अत्याचार

Pune Crime : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणीवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.

सदर आरोपींनी मुलींवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ दुसऱ्याला दिला व त्यांनी तो व्हिडिओ त्यातील एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकुण पाच जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन अल्पवयीन सख्ख्या मावस बहिणी घरात एकट्या असताना अवधूत राजू पंचरास, कुणाल कैलास बोऱ्हाडे, दोन अल्पवयीन मुले यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावून, जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे.

तसेच सदर आरोपींनी मुलींवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो महेश सुभाष तांबे याला दिला होता. त्यानंतर महेश तांबे याने तो व्हिडिओ त्यातील एका मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील काही संशियाताना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे व पारगाव पोलीस करत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply