Crime News : बीडसह मावळमध्ये बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर कारवाई, लाखाेंचा मुद्देमाल हस्तगत

Crime News : लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड आणि मावळ येथून सुमारे सहा लाख रुपयांची दारू पकडण्यात आली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी संशयितांवर कडक कारवाई केली आहे. लाेकसभा निवडणुकीच्या कालावधीत गैरप्रकार हाेऊ नये यासाठी खासगी वाहनांच्या तपासणीची मोहीम वाढविणार असल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे. या नाकाबंदीत एक लाख 28 हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यापुढेही अशाच पद्धतीने वाहनांची तसेच अवैध दारू विक्रीची तपासणी केली जाणार असल्याचे पाेलिसांनी नमूद केले.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी मोठी अपडेट; रविवारी रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल!

मावळात दारु निर्मिती अड्डा उद्ध्वस्त

मावळच्या औंधे गावाला लागत असलेल्या कंजार भात वस्ती शेजारी असलेल्या नाल्यात अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या धंद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग तळेगावच्या वतीने हातोळा चालवून 3,89,100 कच्च दारू बनवण्याचा रसायन उद्ध्वस्त केले. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. विपिन भरत राजपूत आणि ईशांत भरत राजपूत अशी संशयित आरोपींची नावे असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सराफ यांनी दिली.

सराफ म्हणाले दोन व्यक्ती दुचाकीवर 35 लिटरची गावठी हातभट्टी दारू विकायला घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने दोन पथक तयार केली. या पथकांनी आरोपींना गाठले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी जिथे बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार केली जाते तिथे घेऊन गेले. घटनास्थळी जमिनीत पुरलेले गावठी हातभट्टी रसायनांचे बॅरल दिसले. लगेच त्यांनी सर्व रसायन उद्ध्वस्त केले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply