Crime News : खळबळजनक! समोश्यांमध्ये आढळले कंडोम, गुटखा आणि खडे; पुण्यातील धक्कादायक घटना

Crime News : ऑटोमोबाईल कंपनीला पुरवलेल्या समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुण्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये एका उपकंत्राटदार कंपनीच्या दोन कामगारांचा समावेश आहे. ज्यांना समोसे पुरवठ्याचे कंत्राट मिळाले होते. तसेच ते भेसळ केल्याप्रकरणी यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या अशा अन्य फर्मचे  तीन भागीदार आहेत. कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मकडे ऑटोमोबाईल कंपनीच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ पुरविण्याचे कंत्राट आहे.  

Songir Accident : महामार्ग दुरुस्ती करणाऱ्या मजुरांना भरधाव डंपरने उडविले; एकाच मृत्यू, मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

या फर्मने मनोहर एंटरप्रायझेस नावाच्या दुसऱ्या उपकंत्राटदार कंपनीला समोसे पुरवण्याचे कंत्राट दिले होते. शनिवारी ऑटोमोबाईल कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना समोश्यामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे सापडले. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना संपर्क साधला.

त्यानंतर संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत आपण समोस्यामध्ये झुरळं, किंवा किडे सापडल्याच्या घटना ऐकल्या होत्या. परंतु समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे आढळणे ही खूप गंभीर बाब आहे. त्यामुळे याप्रकरणाची दखल गांभीर्याने घेतली जात आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

समोश्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि खडे आढळल्यानंतर  संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारांमुळे आता बाहेरील खाद्यपदार्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply