Crime News : रील बनवायचं वेड, मातापित्याने ८ महिन्याच्या पोटच्या लेकराला विकलं; कारण ऐकून पोलिसही चक्रवले

कोलकत्ता : पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रील बनवण्यासाठी आयफोन घ्यायला पैसे नसल्यामुळे नराधम मातापित्याने आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळाला विकल्यानंतर दुसऱ्या मुलीलाही विकण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

अधिक माहितीनुसार,पश्चिम बंगालमधील उत्तर परगणा जिल्ह्यातील पानिहाटी येथील गांधीनगर मध्ये सदर दाम्पत्य आपल्या आईवडिलांसोबत आणि दोन मुलांसोबत राहत होते. साथी कनई असं आरोपी महिलेचं नाव असून जयदेव असं तिच्या पतीचं नाव आहे. ते मोलमजुरी करून उदर्निवाह भागवतात. त्यांना एक आठ महिन्याचं बाळ आणि एक मुलगी आहे.

पण एके दिवशी अचानक त्यांच्याकडे महागडा आयफोन आल्यामुळे शेजारचे चकीत झाले. तर ही महिला रील बनवण्यासाठी फिरत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्याचं आठ महिन्याचं बाळही दिसत नसल्याने विचारणा केली असता त्यांना स्पष्ट उत्तर देता आलं नाही त्यामुळे शेजाऱ्यांचा संशय बळावला.

शेजाऱ्यांच्या दाबावानंतर पैशासाठी बाळाला विकलं असल्याचं या नराधम मातापित्याने कबूल केलं. बाळाच्या बदल्यात पैसे घेतल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला आणि बाळ विकत घेणाऱ्या महिलेला अटक केली असून आरोपी पिता फरार आहे. पोलिसांकडून बाळाची सुटका करण्यात आली आहे.

Cyber Crime : पुण्यातल्या बँकेवर सायबर हल्ला; 439 बनावट ATM कार्ड बनवून एक कोटीच्या वर रक्कम लांबवली

दरम्यान, आठ महिन्याच्या बाळाची विक्री केल्यानंतर मध्यरात्री या दाम्पत्याने मुलीलाही विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली असं स्थानिक नगरसेवक तारक गुहा यांनी सांगितलं. याप्रकरणी अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply