Crime case : पुण्याच्या महिला डॉक्टरला गंडवणाऱ्या डॉक्टराला बेड्या, विवाहित असताना दिला गुलिगत धोका

Crime case : बिबवेवाडी पोलिसांनी डॉक्टर कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३०) या आरोपीला नवी मुंबईतून अटक केली आहे. सावंतने विवाहविषयक संकेतस्थळावर अविवाहित असल्याची खोटी नोंदणी केली. नंतर डॉक्टर तरुणीला फसवलं. तिच्याकडून १० लाख रुपये उकळल्यानंतर तरूणीनं विवाहाबाबत विचारल्यावर स्वतः विवाहित असल्याचा खुलासा केला. या धक्क्याने तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणी तरूणीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी सावंत यानं एका विवाहविषयक संकेत स्थाळावर नोंदणी केली होती. नोंदणी केल्यानंतर त्याची ओळख डॉक्टक तरूणीशी झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. सांवत विवाहित होता, त्यानं ही बाब मुलीपासून लपवली. त्यानंतर डॉक्टर तरूणीला जाळ्यात ओढण्याचं काम त्यानं केलं. तिच्याकडून १० रूपये घेतले. तरूणीनं काही दिवसानंतर लग्नाबाबत विचारणा केली. तेव्हा त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. तसेच पैसेही दिले नाहीत.

Republic Day 2025 : महाराष्ट्रातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक; ३९ जवान ठरले सेवा पदकाचे मानकरी, वाचा संपूर्ण यादी

तरूणीनं जाब विचारले असता, त्यानं विवाहित असल्याचा खुलासा केला. डॉक्टर तरूणीला धक्काच बसला. त्यानंतर तिनं स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. तरूणीनं बिबवेवाडीत असलेल्या दवाखान्यात विषारी औषध खात आत्महत्या केली. या घटनेबद्दल तरूणीच्या वडीलांना माहिती मिळताच त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाणे गाठले. तसेच डॉक्टर आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सावंत पसार झाला. बिबवेवाडी पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. आरोपी नवी मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकानं कारवाई करत आरोपी सावंतला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply