Covid 19 Update : कोरोनाचा कहर! राज्यात गेल्या 24 तासांत 803 नव्या रूग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू

कोरोनाची साथ पसरून रुग्ण वाढण्याच्या भीतीने केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही आपली यंत्रणा सतर्क करतानाच उपायांची तयारी सुरू केली आहे. ‘सध्या मास्क बंधनकारक नसले; तरी कोरोनाच्या संशयित रुग्णांनी आणि लक्षणे आढळणाऱ्यांनी मास्क वापरण्याचे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा कहर पाहिला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये भर पडत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ८०३ नवे करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ३ हजार ९८७ सक्रिय रूग्ण आहेत. तर एकूण तिन जणाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता चिंतेत वाढ झाली आहे.

दरम्यान शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्री राज्य सरकारांसोबत बैठक घेणार आहेत. देशामध्ये कोरोना विषाणूचं संक्रमण वाढत असल्याने केंद्र सरकार सतर्क झालेलं आहे. गुरुवारी दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतरच शुक्रवारी दुपारी १२ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यांच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

या बैठकीमध्ये सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांचा सहभाग असेल. बैठकीत कोरोनाची परिस्थिती, वाढते रुग्ण, उपाययोजना आणि तयारी; याबाबत चर्चा होणार आहे.

राज्यात १३-१४ एप्रिल्रला रोजी कोरोना मॉकड्रील

महाराष्ट्रात १३ आणि १४ एप्रिल रोजी कोरोनासाठी मॉकड्रिल घेतले जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा कोविड आढावा घेतला जाणार आहे. राज्यात सर्वेक्षण आणि परीक्षण सुरु आहे. मात्र काळजी करण्याचे कारण नाही असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.  महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर १.८२% आहे. राज्यात एकूण ३,९८७ सक्रिय रुग्ण आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply