Coronavirus New Variant : कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे केरळमध्ये 2 जणांचा मृत्यू, कर्नाटक-तामिळनाडू अलर्ट मोडवर

Coronavirus New Variant : जगभरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकार समोर आला आहे. या प्रकारचं नाव JN.1 असल्याचं सांगितलं जात आहे. याचे रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. देशात केरळ राज्यात या विषाणूची लक्षणे आढळून आली असून, त्यामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या संदर्भात केरळच्या शेजारील राज्य कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Surat Diamond Bourse : PM नरेंद्र मोदींनी गुजरातला दिली मोठी भेट; 'सुरत डायमंड बोर्स', विमानतळ टर्मिनलचं उद्घाटन

केरळमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे 2 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे शेजारील राज्य कर्नाटक देखील सतर्क झालं आहे. याबाबत कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी कोरोना व्हायरसच्या प्रकरणांबाबत सांगितले की, सध्या काळजी करण्याची गरज नाही. राज्यात कोविड-19 चे केवळ 58 रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी 11 रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत आणि उर्वरितांवर त्यांच्या घरी उपचार सुरू आहेत. गेल्या तीन महिन्यांत फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, त्याला कोरोनासोबत इतर गंभीर आजार होते.  

कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, आम्ही आमच्या राज्यात कोरोना व्हायरसबाबत आवश्यक पावले उचलत आहोत. केरळमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सर्व रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांना चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या लोकांमध्ये खोकला, फ्लू किंवा कोरोना विषाणूशी संबंधित लक्षणे दिसत आहेत, त्यांची तपासणी करून उपचारासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत.

सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले

सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. भारत सरकारने याबाबत लोकांना सावध राहण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि सोशल इतरांपासून अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे. सरकारच्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये असेही म्हटले आहे की, श्वासोच्छवासाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी घराबाहेर पडू नये किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. तसेच लोकांना मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply