Coronavirus: पुणेकरांनो सावधान! दगडुशेठ गणपतीच्या दर्शनाला जाताये? मास्क जवळ बाळगा

पुणे : भारतात चीनमधील कोरोनाचा नवा व्हेरियंट BF.7 दाखल झाला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रानं सर्व राज्यांना कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळं आता पुण्यातील एक गर्दीचं ठिकाणं असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती देवस्थान प्रशासनानंही याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचं आवाहन दगडूशेठ गणपती मंदीर प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन तातडीनं गणेशभक्तासांठी ५ हजार मास्क खरेदी करणार आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आलं आहे.

दरम्यान, सध्या मंदीर प्रशासनाच्यावतीनं ज्या भाविकांकडे मास्क नाहीत अशांना मास्कचं मोफत वाटप केलं जात आहेत. त्याचबरोबर मास्क वापरा अशा सूचना मंदिरातील फलकावर लावण्यात आल्या आहेत. याद्वारे मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ....



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply