Corona Variant JN.1 Cases News : कोरोनाचा कहर वाढला, रिपोर्ट आणि आकडेवारी चिंताजनक, तज्ज्ञांना वेगळंच टेन्शन

Corona Variant JN.1 Cases News : देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. केरळमध्ये बुधवारी ३०० नवीन रुग्ण आढळले आहेत तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात कोरोना रुग्णांची संख्या २६६९ वर पोहोचली आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. कोरोना कोणत्याही संसर्गजन्य रोगासारखा असून त्याचा पूर्णपणे नायनाट करता येणं शक्य नाही, असं मत केरळमधील एका आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे चिंता वाढली आहे.

Mumbai Crime News : शाळेच्या वॉचमनचा ४ वर्षीय चिमुकलीवर क्लासरुममध्येच अत्याचार; मालाडमधील घटनेने खळबळ, आरोपी अटकेत

गेल्या २४ तासात भारतात कोरोनाच्या ३५८ नव्या रुग्णांची नोदं झाली असून त्यातील ३०० रुग्ण एकट्या केरळमधील आहेत. या कालावधीत देशभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या कर्नाटकमध्ये २, पंजाबमध्ये १ आणि केरमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २६६९ वर पोहचली आहे.

24 तासात कोणत्या राज्यात किती रुग्ण

केरळ -३००

उत्तर प्रदेश -२

महाराष्ट्र -१०

कर्नाटक -१३

गुजरात - ११

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply