महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक; आजच्या आकडेवारीमुळे नागरिकांच्या चितेंत भर

मुंबई: राज्यात मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांत लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी, ५ जून रोजी महाराष्ट्रात १४९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६७६७ वर पोहोचली आहे. याशिवाय, दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

राज्यात आतापर्यंत कोरोनाने  मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १,४७,८६६ झाली. दिवसभरात ६१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णांची संख्या ७७,३८,५६४ झाली आहे. राज्यातील बरे होण्याच दर ९८.०४% एवढा आहे. तर मृत्यू दर १.८७% एवढे आहे.

मुंबई विभागात- ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल या शहरांचा समावेश आहे. या विभागात १३६२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नाशिक विभागात - यामध्ये नाशिक, नाशिक एमसी, मालेगाव एमसी, अहमदनगर, अहमदनगर एमसी, धुळे, धुळे एमसी, जळगाव, जळगाव एमसी, नंदुरबार यांचा समावेश आहे, या विभागात १३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पुणे विभागात- यात पुणे, पीएमसी, पीसीएमसी, सोलापूर, सोलापूर एमसी, सातारा यांचा समावेश आहे. या विभागात ९९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

कोल्हापूर विभागात- कोल्हापूर, कोल्हापूर एमसी, सांगली, सांगली एमसी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात आज २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.(Corona Latest News)

औरंगाबाद विभागात- औरंगाबाद, औरंगाबाद एमसी, जालना, हिंगोली, परभणी, परभणी एमसी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

लातूर विभागात- लातूर, लातूर एमसी, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड एमसी, या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात नव्या १ रुग्णाची नोंद झाली आहे.

अकोला विभागात- अकोला, अकोला एमसी, अमरावती, अमरावती एमसी, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे, या विभागात ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूर विभागात- नागपूर, नागपूर एमसी, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, चंद्रपूर एमसी, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात ५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply