Corona Cases In Hingoli : कोरोना बाधित रुग्णाने रुग्णालयातून ठोकली धूम; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

Corona Cases In Hingoli : हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात कोरोना बाधित आढळलेल्या एका ज्येष्ठ रुग्णाने उपचार सुरू असताना पळ काढला आहे. 24 तासांपासून हा रुग्ण गायब झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिलेये. या प्रकारानंतर हिंगोली पोलिसांनी तातडीने या रुग्णाचा शोध घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत हा रुग्ण नेमका कुठे गेला याची माहिती मिळू शकलेली नाही. 

राज्यात कोरोना रुग्णांची सध्या वाढताना दिसतेय. त्यामुळे सर्वांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोना हा संसर्गजन्य विषाणू असल्याने ज्या व्यक्तीला याची लागण होईल त्याने कॉरंटाइन होणे गरजेचे आहे. मात्र सदर रुग्ण रुग्णालयातून पळून गेल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

Coronavirus : देशासह राज्यात कोरोनाची चिंता वाढली! आज कोरोनाच्या 28 नव्या रुग्णांचं निदान, JN1 चे 10 सक्रिय रुग्ण

नाशिकमध्ये देखील नव्या जेएन.१ व्हेरिएंटने या नव्या व्हेरिएंटचा संशयित रुग्ण आढळल्याची माहिती आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका महिलेला त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेला जेएन.१ व्हेरिएंटची प्राथामिक लक्षणे असल्याचा संशय डॉक्टरांना आहे. सध्या संशयित महिलेला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply