Contaminated Water : दूषित पाण्यामुळे १३० जणांना बाधा; आरोग्य पथक तळ ठोकून

Contaminated Water : दूषित पाण्यामुळे त्रास जाणवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुगाव तांडा या छोट्याशा वाडा वस्तीतील १३० जणांना दूषित पाण्यामुळे बाधा झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुगाव तांडा येथे हा प्रकार घडला आहे. ५०० ते ६०० जणांची वस्ती असलेल्या या तांड्यात मागील अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. दूषित पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्यात दुर्लक्ष झाल्याने येथील नागरिकांच्या हे पाणी पिण्यात येत होते. यामुळे ग्रामस्थांना उलट्या, मळमळ, जुलाब होत आहे. 

Supriya Sule : 'विधानसभेमुळे लाडकी बहिण, भाऊ सगळे आठवतील', अर्थसंकल्पावरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीला खोचक टोला!

रुग्णांची प्रकृती स्थिर 

याबाबतची माहिती मिळताच मांजरम येथी शासकीय आरोग्य पथक गावात दाखल झाले आहे. या पथकाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तब्बल १३० जणांना ही लक्षणे जाणवत असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आले.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply