
युवा वेटलिफ्टिंगपटू अचिंत शुलीने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत भारतासाठी तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. २० वर्षीय अंचितने ७३ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालच्या या खेळाडूने १४३ किलो वजन उचललं. हा या स्पर्धेतील नवीन विक्रम ठरला आहे. शुलीची ही कामगिरी भारतासाठी एकाच दिवसात दुसरं सुवर्णपदकाची कमाई करणारी कामगिरी ठरली. शुलीच्या आधी युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिननुंगाने पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १६० किलो असे एकूण ३०० किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले.
शुलीने स्नॅच प्रकारामध्ये १४३ किलो वजन उचललं. हा या स्पर्धेतील विक्रम आहे. तर शुलीनेच क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १७० किलोसहीत एकूण ३१३ किलो वजन उचलत या स्पर्धेमधील नवीन विक्रम आपल्या नावे करुन घेतला. मागील वर्षी जागतिक स्तरावरील ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये शुलीने रौप्य पदकाची कमाई केली होती. शुलीने आपल्या तिसऱ्या संधीमध्ये राष्ट्रकुलमध्ये पदक मिळवून देणारे दोन्ही लिफ्ट केले. मलेशियाच्या ई हिदायत मोहम्मदला या स्पर्धेत रौप्य तर कॅनडाच्या शाद डारसिग्रीला कांस्य पदक मिळालं. मलेशियाच्या खेळाडून ३०३ किलो तर कॅनडाच्या खेळाडूने २९८ किलो वजन उचललं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन अंचितचं अभिनंदन केलं आहे. “अचिंतने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. तो त्याचा शांत स्वभाव आणि दृढत निश्चयासाठी ओळखला जातो. या विशेष उपलब्धतेसाठी त्याने फार मेहनत घेतली आहे. पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून त्याला शुभेच्छा,” असं मोदींनी म्हटलंय.
शुलीच्या आधी २०१८च्या युवा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या जेरेमीने भारताला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून दिलं. एकूण ३०० किलो वजन उचलत सुवर्णपदकावर जेरेमीने आपलं नाव कोरलं. सामोआचा वैपाव्हा नेव्हो इओआने याने २९३ किलो (१२७ किलो आणि १६६ किलो) वजनासह रौप्यपदक पटकावले. तर नायजेरियाचा एडिडिओंग जोसेफ उमोआफिआने २९० किलोसह (१३० किलो आणि १६० किलो) कांस्यपदक मिळवले. १९ वर्षीय जेरेमीने स्नॅच (१४० किलो) आणि एकूण वजन (३०० किलो) या विभागांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वाधिक वजनाचा विक्रम रचला. क्लीन अॅण्ड जर्कमध्ये वजन उचलताना त्याला दोन वेळा त्रास झाला; पण त्यातून सावरत त्याने सोनेरी यश मिळवले. जेरेमीने स्नॅचमध्ये १४० किलो वजन उचलत सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी एडिडिओंगविरुद्ध आघाडी घेतली. यानंतर अखेरच्या प्रयत्नात त्याने १४३ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. २०२१च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या जेरेमीने क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १५४ किलो वजनासह सुरुवात केली. दुसऱ्या प्रयत्नात त्याने १६० किलो वजन उचलले. मग १६५ किलोचा त्याचा तिसरा प्रयत्न सदोष होता.
जेरेमी लालरिननुंगा (सुवर्ण), मीराबाई चानू (सुवर्ण), संकेत सरगर (रौप्यपदक), बिंद्याराणी देवी (रौप्यपदक) आणि गुरुराजा पुजारी (कांस्यपदक) यानंतर भारताचे वेटलिफ्टिंगमधील हे सहावे पदक आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


