Cold Wave : तापमानाचा पारा घसरला, गायब झालेली थंडी परतली, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Winter Update : किमान तापमानात घट झाल्यामुळे राज्यातून गायब झालेली थंडी पुन्हा परतण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचा पारा तीन ते चार अंशांनी घसरलाय. शुक्रवारपासून राज्यात थंडी वाढण्यास सुरूवात झाली आहे. आज राज्याचा पारा आणखी घशरला आहे. पुढील दोन दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यात पुन्हा थंडीला पुन्हा सुरवात झाली आहे.

दोन आठवड्यांपासून गायब झालेली थंडी शुक्रवारी पुन्हा परतली. आज राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. काही ठिकाणी तापमान १० अंशांवर आले असून, पुण्यात ११.७ अंश नोंदले गेले. दोन दिवसांत थंडीत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात सकाळपासून थंडीचा कडाका जाणवू लागला आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली घसरला आहे. पुढील काही दिवसांत राज्याच्या किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. राज्यात आकाश निरभ्र असल्याने स्वच्छ सूर्य प्रकाश जमिनीवर येत आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा हळूहळू खाली घसरत असतानाच, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका थोड्याफार प्रमाणात जाणव्याची शक्यता आहे.

Mira Road firing : महाराष्ट्रात चाललंय काय? मुंबईतील शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात सकाळच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवत आहे. काही भागात धुक्याची चादर परसली आहे. उत्तर भारतात चढ-उतार होत असलेल्या थंडीचा अनुभव येत आहे, तर दक्षिणेकडील प्रदेशात कमाल तापमान स्थिर आहे. तापमानात घसरण झाली असली तरी शुक्रवारी दुपारनंतर अनेक भागात लक्षणीय उष्मा दिसून आला. येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

सातपुडा पर्वत रांगेत पुन्हा वाढला गारठा

नंदूरबार जिल्ह्यातील गेल्या 15 दिवसात वातावरणात सातत्याने बदल होत असून कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पासून नंतर वाढलेलं तापमान मात्र या बदलत्या वातावरणामुळे पुन्हा एकदा सातपुड्यातील डोंगर रांगेत तापमानात घट होताना पाहायला मिळत आहे सातपुड्यात तापमानाचा पारा हा 15 अंश सल्सिअसने घरसून आता 9 अंश सेल्सिअस चा खाली आला असून गारठा वाढला आहे वाढत्या थंडमुळे पुन्हा सातपुड्यात शेकोट्या या पेटलेल्या पाहायला मिळत आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply