Coal Scam: विजय दर्डा-देवेंद्र दर्डा पितापुत्रांना चार वर्षांचा कारावास; दिल्ली विशेष न्यायालयाचा निकाल

Coal Scam Case : कोळसा घोटाळा प्रकरण दिल्लीच्या विशेष न्यायालयाने छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपाच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा यांना मोठा दणका दिला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आज (बुधवारी) विजय दर्डा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा सुनावली.

विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

Raj Thackeray : मनसेकडून टोलनाक्याच्या तोडफोडीनंतर राज ठाकरे आक्रमक; अमित ठाकरेंसोबत त्या दिवशी काय घडलं?

याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने विजय दर्डा आणि इतरांना कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply