Cm Eknath Shinde : 'राममंदिर बांधून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केलं...' मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

Cm Eknath Shinde : देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिककरांनी पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण नाशिक नगरी ही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजवण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये तपोनव मैदानात 27 व्याराष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन झाले.

पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री अनुगान ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक केले.

Indias Cleanest State : स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सासवडने मारली देशात बाजी !

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

“नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान नाशिकमधील पवित्र भूमित आले आहेत. अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरासाठी हा शुभ संकेत आहे, असे  एकनाथ शिंदे  म्हणाले.

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण...

तसेच "अयोध्येत राम मंदिर बनवण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांचे होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. मोदी है तो मुमकीन है. पंतप्रधान लक्षद्वीपला गेले, तर मालदीवमध्ये भूकंप आला. आपल्या देशाकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत कुणाचीही नाही. भारताचा डंका जगभरात वाजत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो...

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाशिकमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी सुमारे दीड किलोमीटरचा भव्य रोड शो करण्यात आला.

या रोड शो दरम्यान जय श्री रामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळाले. आगामी लोकसभेच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे. त्यामुळेच या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींसह भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply