CM Eknath Shinde : बाबा सिद्धिकी यांच्या हत्येचं हरियाणा आणि उत्तर प्रदेश कनेक्शन उघड; मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले कारवाईचे आदेश

Mumbai :  मुंबईच्या वांद्रे येथे अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्धिकी यांची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तीन ते चार जणांनी केलेल्या गोळीबारात बाबा सिद्धिकी यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येचं हरियाणा आणि उत्तर प्रदेश कनेक्शन उघड झालं आहे. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येवर मुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे. बाबा सिद्धिकी यांच्या हत्याकांडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'बाबा सिद्धिकी यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे. या घटनेत दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे'.

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू; मुलाच्या कार्यालयाबाहेर झाला गोळीबार

'या प्रकरणातील एक आरोपी हरियाणा आणि एक उत्तर प्रदेशचा आहे. मी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. एक जण फरार आहे. कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.

बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. सिद्धिकी यांच्या निधनाने मला धक्का बसला. मी माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. या हल्ल्याचा निषेध करतो, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार असल्याची माहिती मिळत आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या भूमिकेचा पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे. अभिनेता सलमान खानला मदत केल्याप्रकरणी गोळीबार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सलमान खान बाबा सिद्दीकी यांचा जवळचा मित्र आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply