CM Eknath Shinde : नैराश्येने ग्रासलेले; तडीपार लोक एकत्र.. 'इंडिया आघाडी'च्या सभेवर CM शिंदेंची जहरी टीका

CM Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे जागा वाटपासंदर्भात बैठकांचा धडाका सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी शिंदे सरकारच्या कार्यकाळ आणि कामांवर भाष्य केले तसेच कालच्या इंडिया आघाडीच्या सभेवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

"शेतकरी युव बेरोजगर आणि उद्योग यात महाराष्ट्र पुढे आहे. कोस्टल रोड, मेट्रो, अटल सेतू, अनेक काम आजही प्रगती पतावर आहेत. मात्र हेच प्रकल्प याधीच्या सरकरामध्ये सकारात्मक गोष्टींमुळे अनेक प्रकल्प रखडले. आज केंद्र आणि राज्यसरकर हे डबल इंजिन सरकारने अनेक कामांना प्राधान्य दिलं. ५५ कॅबिनेटमधून लोकहिताचे आमही हाती घतले ते निर्णय तुमच्या समोर आहेत, झालेली कामं पहत मी समाधानी आहे," असेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  म्हणाले.

MP Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरमधून खासदार इम्तियाज जलील पुन्हा लोकसभेच्या रिंगणात; ओवेसींची अधिकृत घोषणा

इंडिया आघाडीच्या मुंबई सभेवर टीकास्त्र..

"कालची सभा ही फॅमिली गॅदरिंग होती. नैराश्येने ग्रासलेले लोक, जनतेने तडीपार केलेले लोक एकत्र आले होते. ते धरून बांधून एकत्र आलेत. सावरकरांच्या स्मारकासमोर आणि बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळासमोर ही सभा झाली हा काळा दिवस होता. ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्यासोबत बसले. उद्धव ठाकरे यांनी खरी बाळासाहेबांची माफी मागायला हवी," असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर उद्धव ठाकरे टीका केली.

तसेच "विजय शिवतारे भेटले मी त्यांना युती धर्म पाळण्यास सांगितले आहे. महायुतीत सर्व शिवसैनिक जो उमेदवार देतील तो निवडून आणणार आहोत. जागा वाटप समन्वयाने होईल, योग्य वेळी निर्णय होईल ४५ जागा पार होईल, असे म्हणत मोदींजींचे ४०० पारचे स्वप्न पुर्ण करु.." असेही एकनाथ शिंदे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply