Chinchwad Byelection : निवडणूक प्रचार शिगेला; CM एकनाथ शिंदे पहाटे ३ वाजता जगतापांच्या घरी

पुण्यातील पोटनिवडणूकीसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणूकीत भाजपच्या अश्विनी जगताप तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

निवडणूक जींकण्यासाठी भाजप व मविआकडून जोर लावला जात आहे. यादरम्यान आज पहाटे तीनच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील चिंचवडमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी अश्विनी जगताप यांची भेट देखील घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातील काल दिवसभरातील कार्यक्रम संपवून मध्यरात्री चिंचवड येथे पोहचले. येथे त्यांनी भाजपच्या शेकडो कार्यकत्यांची भेट घेतली. यानंतर शिंदे यांनी चिंचवड पोटनिवडणूकीतील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांची भेट देखील घेतली. शिंदे आणि जगताप यांच्यात काय चर्चा झाली ते मात्र समजू शकलले नाही.

यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे म्हणाले की, मी भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. कार्यकर्त्यांचा उत्साह तीन वाजला आहेत तरी पाहतोय. ही जागा प्रचंड मतांनी अश्विनी जगताप विजयी होतील असेही त्यांनी सांगितले.

अश्विनी जगतापांना निवडणूक आयोगाची नोटीस

भाजपच्या चिंचवडमधील उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना पेड न्यूज प्रकरणामध्ये ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जगताप यांच्याकडून आयोगाने या प्रकरणी लेखी उत्तर मागवले आहे. अश्विनी जगताप यांनी याबाबत खुलासाही पाठवला आहे. आता या उत्तराची पडताळणी आयोगाच्या विशेष समितीमार्फत सुरु आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply