Chhattisgarh Assembly Election 2023 Results : छत्तीसगडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, भाजप बहुमताच्या दिशेने

Chhattisgarh Assembly Election 2023 Results : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा निकाल आज 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. राज्यात 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात मतदान पार पडले. छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ 3 जानेवारी 2024 रोजी संपत आहे.

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 90 जागा आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 46 जागांची आवश्यकता असते. यावेळी छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात राज्यातील 20 नक्षलग्रस्त जागांवर 7 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते, तर 17 नोव्हेंबर रोजी उर्वरित 70 विधानसभा जागांवर मतदान झाले होते.

गेल्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर 2018 मध्ये झाल्या होत्या आणि भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply