Chhatrapati shivaji Maharaj Bakhar : फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची 91 कलमी बखर; दुर्मिळ बखरीतून उलगडणार शिवरायांचं चरित्र

Chhatrapati shivaji Maharaj Bakhar : छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून सांगणारी दुर्मिळ बखर फ्रान्सच्या लायब्ररीत सापडलीय. त्यामुळे या बखरीतून शिवरायांचं चरित्र उलगडणार आहे. मात्र ही बखर कधीची आहे? या बखरीतून कोणत्या गोष्टी उलगडणार आहेत. त्यावरचा हा खास रिपोर्ट.

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा आणि आयुष्याचा उलगडा करणारी बखर थेट सातासमुद्रापार फ्रान्समध्ये सापडलीय...मोडी लिपीतील ही बखर आतापर्यंत सापडलेल्या बखरींचा पुर्वासुरी दस्तावेज असल्याचं पुण्यातील इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर यांनी म्हटलंय.

Mohan Bhagwat : संघाची नाराजी दूर करण्याची जबाबदारी योगींवर? आदित्यनाथ घेणार मोहन भागवतांची भेट

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीस बखर, चित्रगुप्त बखर, दलपतरावाची बखर, शिवदिग्विजय बखर. मराठा साम्राज्याची बखर अशा अनेक बखरीतून प्रकाश टाकण्यात आला. पण यापेक्षा वेगळी आणि तब्बल अडीचशे वर्षांपेक्षा अधिक काळ फ्रान्सच्या नॅशनल लायब्ररीत पडून असलेली मोडी लिपीतील बखर समोर आलीय.

बखरीत काय?

मोडी लिपीतील हस्तलिखीत स्वरुपातील बखर

छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीचा प्रारंभ

छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्यातील संवादाचा उल्लेख

अफजलखानाला मारलं त्यावेळी कोण उपस्थित होतं?

साधूसंतांच्या शिवाजी महाराजांनी घेतलेल्या भेटी

ही बखर चिमाजी अप्पांच्या सिद्दीवरील स्वारीनंतर म्हणजे 1740 नंतर लिहीली असावी.

आतापर्यंत मिळालेल्या सर्व 91 कलमी बखरींचा पूर्वासुरी दस्तावेज आहे.

बखरीच्या शेवटी किताबत राजश्री राघो मुकुंद असा उल्लेख करण्यात आलाय.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील बखर प्रकाशित होऊन साठ ते सत्तर वर्ष झाले आहेत. मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीतील काही भाग या बखरीशी जुळतोय. त्यामुळे पावणे तीनशे वर्षांपूर्वीची ही मोडी लिपीतील बखर आढळून आल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटातील समोर न आलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकला जाणार आहे. त्याचा आगामी काळात मोठा फायदा होऊ शकतो.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply