Chhatrapati Sambhajinagar News : बराच वेळ झाला गेली कुठे? मुलांना शोधताना पालक हादरले, ४ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथे पोहोण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे चारही मुलं 12 ते 14 वयोगटातील होती, असं सांगण्यात येत आहे. ही हृदयद्रावक घटना संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

बिश्वजीतकुमार सुखदेव उपाध्यय (12), अबरार जावेद शेख (12), अफरोज जावेद शेख (14), अशी मृत मुलांची नावे आहेत. यातील एका 14 वर्षीय मुलाची अद्याप ओळख पटलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुले गुरुवारी दुपारी रांजणगाव (शेणपुंजी) येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. 

Nawab Malik : नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; मनी लाँड्रिंग प्रकरणात ६ महिन्यांसाठी जामीन केला मंजूर

मात्र बराच वेळ झाला तरी मुले घरी आली नसल्याने पालकाने परिसरात विचारपूस केली. ही सर्व मुले पाझर तलावाकडे गेली असल्याची माहिती मिळाल्याने पालकांनी तेथे जाऊन पाहिले असता तलावाच्या काठावर कपडे व मोबाईल दिसून आले. ते पालकांनी ओळखल्याने मुले बुडाल्याची खात्री झाली. 

ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने रांजणगाव (शेणपुंजी) येथील उद्योजक प्रभाकर महालकर, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, जावेद शेख, साईनाथ जाधव व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून आणण्यास मदत केली.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply