
Chhatrapati Sambhajinagar : महिलांसाठी साडी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. या साड्यांसाठी महिलांची लगबग आपण नेहमीच पाहतो. साड्यांसाठी एखादी ऑफर मिळाली तर त्यांचा आनंद द्विगुणित होतो. मात्र एखाद्या गोष्टीची जास्त लालचं असणे चुकीचे ठरू शकतं. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. पाच हजाराची साडी ५९९ रुपयाला मिळते आहे, याची सोशल मीडियावर रील बघताच महिलांनी संबंधित दुकानात तुफान गर्दी केली. या गर्दीत ३ महिला बेशुद्ध पडल्या असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मकर संक्रांत काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने छत्रपती संभाजीनगर शहरातील त्रिमूर्ती रोडवरील एका मोठ्या दुकानात साड्यांवर ऑफर ठेवण्यात आली होती. ही ऑफर रीलच्या माध्यमातून घराघरांत पोचवण्यात आली. गेल्या ३ महिन्यांपासून स्थानिक रीलस्टार्समार्फत १९९ ते ५९९ रुपयांमधील साड्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात होते.
|
|
रविवारी या दुकानाचे उदघाटन होते.सकाळी १० वाजल्यापासूनच महिलांच्या रांगा लागल्या होत्या. त्या दिवशी सकाळी ११ वाजता उद्घाटन होऊन दुकान उघडताच महिलांनी आत शिरण्यासाठी एकच गर्दी केली. ५ हजारांची साडी फक्त ५९९ रुपयांना मिळते म्हणून रील बघून महिलांनी दुकानात एकच गर्दी केली. या गर्दीत चेंगगराचेंगरी झाली.
काही वेळातच रस्ता पूर्णपणे जाम झाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.दुकानात महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी तातडीने पथकासह धाव घेतली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी माईकचा वापर केला. 'ही ऑफर केवळ आजपुरती नसून ३६५ दिवस राहणार आहे,' असे जाहीर केल्यानंतर आणि बळाचा वापर करण्याचा इशारा दिल्यानंतर दुपारी २ वाजता ही गर्दी निवळली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Chhatrapati Sambhajinagar : ₹५,०००ची साडी फक्त ₹५९९ला! ऑफरच्या झुंबडीत महिलांची धावपळ; संभाजीनगरमध्ये चेंगराचेंगरी”